आठवणीतले पु.लं.

November 6, 2011 4:12 PM0 commentsViews: 15

06 नोव्हेंबर

पुलं एक नट, लेखक, गायक म्हणून तर श्रेष्ठ होतेच पण त्याही पलीकडे ते एक ग्रेट व्यक्तिमत्व होते. त्यांच्या याच विविध पैलुंचं दर्शन मुंबईतल्या पुलोत्सवात पहायला मिळालं. पुलं दर्शन या प्रदर्शनातून पुलंचा जीवनपट, त्यांची हस्तलिखितं, छायाचित्र, पुस्तकं, त्यांच्या वस्तू , सन्मानचिन्ह अशा अनेक पुलकित गोष्टी पहायला मिळतात. तसेच अनेक चित्रकारांनी त्यांच्या कुंचल्यातून उतरवलेले पुलंही या प्रदर्शनात पहायला मिळतात. गोरेगाव इथं हा पुलोत्सव सुरू आहे. या पुलोत्सवात शनिवारी दर्शन झालं ते पुलंच्या विविध व्यक्तिरेखांचं…अंतू बर्वा, सखाराम गटणे, चितळे मास्तर,बापू काणे अशी सामान्यांतली असामान्य व्यक्तिमत्व यावेळेस पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली.जयंत सावरकर, अरूण नलावडे आणि अतुल परचुरे यांनी ही व्यक्तिमत्व सादर केली.

close