‘रॉकस्टार’ च्या प्रमोशनाची धूम

November 10, 2011 12:46 PM0 commentsViews: 4

09 नोव्हेंबर

येत्या शुक्रवारी रिलीज होणार्‍या रॉकस्टार या सिनेमाचे प्रमोशन अनेक शहरात सुरू आहे. या प्रमोशनमध्येच आम्ही रणबीर कपूर आणि नर्गिस यांना गाठलं. रॉकस्टारची टीम सध्या सिनेमाची प्रमोशनमध्ये जाम बिझी आहे. जयपूर पासून ते हैदराबाद पर्यंत, तसेच नागपूरपासून ते पुण्यापर्यंत अशा वेगवेगळ्या शहरांचा दौरा ही टीम करतेय. सगळ्यांसाठीच हा प्रवास आनंददायी आहे. सिनेमाची लिडिंग लेडी म्हणजेच नवोदित नर्गिस फाक्रीसाठी हा रोल करणं एक आव्हान होतं असं ती स्वत:च म्हणते.

या सिनेमात एका मुलाचा रॉकस्टार बनण्याचा प्रवास दाखवलाय, जी भूमिका रणबीर करतोय. पण या सिनेमात विशेष एंट्री आहे ती शम्मी कपूर यांची.सिनियर कपूरना सिनेमात काम करायला राजी करणं तेवढसं सोपं नव्हत. रॉकस्टार ही एक लव्हस्टोरी आहे. इम्तियाझ अली त्यासाठीच प्रसिद्ध आहे. त्याच्या जब वुई मेट, लव्ह आज कल या सिनेमानंतर रॉकस्टारकडून अपेक्षा ठेवायला हरकत नाही.

close