दहशतवादी हल्ल्याला सगळेच जबाबदार – अतुल कुलकर्णी

December 15, 2008 12:00 PM0 commentsViews: 18

मुंबई, 15 डिसेंबर ' मी ही मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला जबाबदार आहे. हे वक्तव्य आहे अभिनेता अतुल कुलकर्णीचं. सामाजिक भान असलेल्या अतुल कुलकर्णीनं नेमकेपणानं समाजातील त्रूटींवर बोट ठेवत आयबीएन-लोकमतच्या ' उद्रेकानंतर पुढे काय ? ' या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या विशेष टॉक शो मध्ये सडेतोड मतं मांडली.दहशतवादी हल्ल्यानंतर पुढे काय, हा चर्चेचा प्रमुख मुद्दा होता. समाजातील राजकीय अप्रगल्भेबाबत बोलताना अतुल कुलकर्णी म्हणाले, कुठलाही मुद्दा असो. शेवटी राजकारण आणि राजकीय नेत्यांवर ठपका ठेवला जातो. गेल्या तीन-चार पिढ्यांपासून राजकारण वाईट आहे, असं लहानग्यांना शिकवलं जात आहे. ते घाण क्षेत्र आहे, असं लहानपणीच मनावर बिंबवलं जातं. जर राजकीय प्रगल्भता नसेल तर नेतेही तसेच राहणार. राजकारण वाईट नाही, हे मुलांना सांगितलं पाहिजं. ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. पण आता सुरुवात न केल्यास पुढे समाजाचं मोठं नुकसान होईल ',. भ्रष्टाचारावर नेमकंपणानं आणि सर्वसामान्यांना पटेल, असं नेमक भाष्य अतुल कुलकर्णीनं केलं. ' भष्ट्राचार राजकारणीच करतात असं नव्हे. आपणही पावलोपावली भष्ट्राचार करतो. आपल्या सर्वांचं कर्तव्य म्हणजे आधी आपला भ्रष्टाचार थांबवला पाहिजे. राजकारण्याची आणि सर्वसामान्यांची भ्रष्टाचाराची प्रवृत्ती तीच. फक्त क्षमतेत फरक असतो. मी जर सिग्नल तोडत असेल तर मी ही या हल्ल्याला जबाबदार आहे. नियम पाळले जात नाहीत ', असं कुलकर्णी म्हणाले. या चर्चेत निवृत्त केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले, माजी पोलीस महासंचालक सुधाकर सुराडकर, सामाजिक कार्यकर्ते डॉल्फी डिसुजा आणि सीएनएन-आयबीएनचे एडिटर-इन-चीफ राजदीप सरदेसाई सहभागी झाले होते. टॉक शोचं सूत्रसंचालन आयबीएन- लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी केलं.या कार्यक्रमाचा व्हिडिओ पहाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा http://www.ibnlokmat.tv/programdetails.php?id=28821&channelid=211

close