नौदलाचा चित्तथरारक युध्दाअभ्यास

November 15, 2011 12:42 PM0 commentsViews: 18

15 नोव्हेंबर

भारताचं नौदल जगातलं चौथ्या क्रमांकाचे सामर्थ्यवान नौदल समजलं जातं. या नौदलाने मुंबईजवळच्या अरबी समुद्रात युद्धाभ्यास केला. नौदलाच्या आयएनएस विराट या विमानवाहू युद्धनौकेसह, बारा युद्धनौका यात सहभागी झाल्या होत्या. पण सर्वांच लक्ष वेधलं ते चार सी हॅरीयर लढाऊ विमानांनी केलेल्या कसरतींनी. त्यांच्या सोबतच तीन सी किंग आणि तीन चेतक चॉपर्सनीही युद्धअभ्यास केला. दरवर्षी केल्या जाणार्‍या या युद्धआभ्यासात नेव्हीचे मार्काेज कमांडोही सहभागी झाले होते. शेकडो नॉटिकल मैलावरील लक्ष्याचा अचूक वेध घेणा-या 'बेतवा', गोदावरी, गंगा, मुंबई, म्हैसूर या विनाशिका आणि शत्रूला रडारवरही पकडता येणार नाही अशी 'तलवार' युध्दनौकाही या सरावामध्ये सहभागी झाल्या होत्या. 'चेतक' आणि 'सी-लिंग' हेलिकॉप्टरने पाण्यात दडलेल्या पाणबुडीचा शोध घेणं हा खेळही अफलातूनच होता. ताशी 900 किलोमीटर वेगाने उड्डाण करणारी 'सी-हॅरियर'ची चार फायटर विमानांचा आकाशातला सरावही चित्तथरारकच होता.

close