ध्यानचंद यांना भारतरत्न द्या – नाना पाटेकर

November 15, 2011 5:41 PM0 commentsViews: 14

15 नोव्हेंबर

खेळाडूंना भारतरत्न द्यायचं असेलं तर आधी मेजर ध्यानचंद यांनाचं भारतरत्न द्यायला हवं आणि त्यानंतर सचिन तेंडुलकरला असं स्पष्ट मत नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं. आयबीएन-लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत नानानं हे मत व्यक्त केलं. ध्यानचंद यांच्या खेळामुळे भारताला मोठ वैभव प्राप्त झालं आहे आणि त्यांचं हॉकीमध्ये खूप मोठ योगदान आहे त्यासाठी ध्यानचंद यांना भारतरत्न द्यावे असं स्पष्ट मत नाना आयबीएन लोकमतकडे व्यक्त केलं. तसेच जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांचे आंदोलन हे कोणत्याही कोणत्याही पक्ष,व्यक्ती विरोधात नसून ते वाईट प्रवृत्ती विरोधात आहे असंही नाना पाटेकर यांनी मत व्यक्त केलं.

close