जेव्हा अण्णा क्रिकेट खेळतात..!

November 16, 2011 5:31 PM0 commentsViews: 1

16 नोव्हेंबर

भ्रष्टाचाराच्या मुद्यावर आपण अण्णांना फटकेबाजी करतांना नेहमीच बघतो पण अण्णांनी आज क्रिकेट पिचवर उतरुन, फटकेबाजी केली.अण्णांनी यावेळी आपल्या क्रिकेटमधलं कौशल्यही दाखवलं. तसेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं अशी मागणी अण्णांनी केली. सचिन अनेक तरूणांचे प्रेरणास्थान आहे त्यामुळे त्याला भारतरत्न देण योग्य ठरेल असं मतही अण्णांनी व्यक्त केलं. मातोश्री लक्ष्मीबाई हजारे यांच्या नावाने आयोजित कऱण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

close