पतंगराव कदम यांची फटकेबाजी

November 17, 2011 5:48 PM0 commentsViews: 53

17 नोव्हेंबर

वनमंत्री पतंगराव कदम यांची प्रेस कॉन्फरन्स म्हणजे पत्रकारांसाठी पर्वणीच.. कोणत्याही विषयावर प्रश्न विचारा, पतंगराव आपल्या खास शैलीत उत्तरं देणार…असाच प्रत्यय आज पुण्यात आला. वनविभागाच्या आढावा बैठकीनिमित्ताने पत्रकार परिषदेत वनमंत्र्यांची गाडी अशीच वेगवेगळ्या विषयांचे स्टेशन गाठत सुसाट निघाली होती. फॉरेस्टचा कायदा कसा कडक आहे हे सांगताना आपल्यालाही या कायद्याचा फटका बसला हेही त्यांनी सांगून टाकलं. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज सरकारच्या एक वर्ष झाल्यानिमित्तानं पतंगराव स्टाईलमधलं विश्लेषणही त्यांनी करुन टाकलं.

close