हा आठवडा ‘अडॉप्शन वीक’ म्हणून साजरा

November 17, 2011 6:12 PM0 commentsViews: 11

शची मराठे ,मुंबई

17 नोव्हेंबर

मूल होत नाही अशा जोडप्यांना दत्तक मूल पालकत्त्वाचा आनंद मिळवून देतो. 14 ते 20 नोव्हेंबर हा आठवडा अडॉप्शन वीक म्हणून साजरा केला जातो. कागदपत्रांचे सोपस्कर पूर्ण झाली आणि आता सोपान आणि उषाला प्रतिक्षा आहे ती त्यांच्या घरी येणार्‍या छोटी पावलांची. मात्र घरी येणारं नवं बाळं मुलगीचं असावं असा निर्णय या दोघांनीही विचारपूर्वक घेतला. वाढीचे टप्पे 3, 5 वर्षांची असताना, असं एक बाबा म्हणूनचं. 'वेटिंग पिरियर' मध्ये असणारे हे भावी आई-बाबा. गेली 3 महिने आपल्या बाळाच्या वाटेकडे डोळे लाऊन बसलेत. पंधरा वर्षापूर्वी अनिल आणि गीता सुखटणकर यांनीदेखील मुलगीचं दत्तक घ्यायचं ठरवलं आणि सेजल त्यांच्या आयुष्यात आली आणि अनिल आणि गीता यांना जगण्याचं एक नवं कारण मिळालं. एकीकडे स्त्री गर्भाची हत्या करण्याच्या घटना घडताहेत तर त्याच समाजात मुलगी अपत्य दत्तक घेण्यासाठी आसुसलेले अनिल-गीता आणि सोपान -उषा असे आई-बाबादेखील वाढताहेत.

close