आयएसआयची अतिरेक्यांना मदत – सीएनएन आयबीएनचा स्पेशल रिपोर्ट

December 15, 2008 5:55 AM0 commentsViews: 1

15 डिसेंबर, नवी दिल्ली व्ही. के. शशीकुमार 'जमात उद दावा' नंतर आता पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेकडं सगळ्या जगाचं लक्ष लागलंय. भारतातल्या वेगवेगळ्या भागात अतिरेकी कारवायांना मदत करणार्‍या आयएसआयच्या ऑफिसेसची पूर्ण यादीच सीएनएन आयबीएनकडे आहे. आयएसआयनं कराचीमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या 500 अतिरेक्यांना सागरी दहशतवादाचं प्रशिक्षण दिलंय. मुंबई हल्ल्याचाही त्यात समावेश आहे. रहीम यार खानमधले आयएसआयचे ऑफीस राजस्थान, दिल्ली आणि पंजाबमधल्या अतिरेकी कारवायांकडं लक्ष देते. सियालकोट, मुझफ्फराबाद, झेलम, डोमेल आणि चकोथीमधले आयएसआयचे ऑफीस जम्मू आणि काश्मीरमधले घुसखोरी आणि दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी सांभाळते. फैसलाबाद हे आयएसआयचं चौकशी आणि लॉजिस्टीक सेंटर आहे. दुबईधलं ऑफीस दाऊद इब्राहिमच्या भारताच्या नेटवर्कला मदत करतं. बनावट भारतीय चलनासाठी काठमांडू हे आयएसआयचं केंद्र आहे. बँकॉक, ढाका आणि काबूलसुद्धा आयएसआयच्या भारतविरोधी कारवायांची केंद्र आहेत.रशियाविरुद्ध लढा देणार्‍या अफगाण मुजाहिद्दिनला मदत करण्यासाठी 80 च्या दशकात अमेरिकेनं आयएसआयचा वापर केला. 90 च्या दशकात आयएसआयनं लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दिन या संघटना उभारून भारताविरुद्ध दहशतवादी युद्धाला सुरवात केली. मात्र आता हेच आयएसआय आणि त्यांनी पोसलेल्या दहशतवादी संघटना अमेरिकेचीची डोकेदुखी ठरू लागल्या आहेत. त्यामुळे आता आयएसआयची दहशतवादी केंद्र बंद करण्यात अमेरिकाही भारताला मदत करेल, असं मानलं जात आहे.

close