सुनील गावस्करांची दिलखुलास फटकेबाजी

November 23, 2011 3:18 PM0 commentsViews: 3

23 नोव्हेंबर

एकाच पिढीतले क्रिकेटर एकाच व्यासपीठावर आले तर काय धमाल उडते हे काल मुंबईकरांना अनुभवायला मिळाले. माजी क्रिकेटर एकनाथ सोळकर फाऊन्डेशनच्या स्थापनेच्या निमित्ताने सुनील गावसकर, रवी शास्त्री, अजित वाडेकर, गुंडाप्पा विश्वनाथ हे क्रिकेटर एका कार्यक्रमात एकत्र जमले होते. आणि त्यामुळे क्रिकेटर्ससाठी जुन्या आठवणी जागवण्याची एक संधी मिळाली. तर प्रेक्षकांना ऐकायला मिळाला क्रिकेट किस्स्यांचा खजाना. इथंही लिटील मास्टर सुनील गावसकर आघाडीवर होते. आणि सोळकर यांचे एकेक किस्से त्यांनी ऐकवले ते मिमिक्रीसह..

close