माथेफिरू हरविंदर सिंगचा उत्तर

November 24, 2011 4:49 PM0 commentsViews: 3

24 नोव्हेंबर

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर आज नवी दिल्ली येथील दिल्ली येथील जंतरमंतर जवळील म.प.च्या कन्व्हेंशन सेंटरमधल्या कॉन्फरन्समध्ये हल्ला केला. हरविंदर सिंग असं या माथेफिरुचे नाव आहे. कॉन्फरन्समधून बाहेर येताना पवार यांच्यावर या तरुणांचे हल्ला चढवला आणि पवारांच्या श्रीमुखात भडकवली. पवारांच्या सुरक्षा रक्षकांनी वेळीच झडप घालून तरुणांला चोप दिली आणि त्या पोलिसांच्या हवाली केले.

कोण आहे हरविंदर सिंग?

हरविंदर सिंग हा मूळचा दिल्लीचाच रहिवासी आहे. तो टेम्पो ड्रायव्हर आहे. काहीच दिवसांपूर्वी त्याने माजी दूरसंचार मंत्री सुखराम यांच्यावरसुद्धा कोर्टाच्या बाहेर हल्ला केला होता. हरविंदर हा नैराश्यग्रस्त आहे. गेल्या आठ वर्षांपासून तो डिप्रेशनसाठी औषधोपचार घेतोय.

close