शरद पवारांवर माथेफिरुचा हल्ला

November 24, 2011 10:05 AM0 commentsViews: 10

24 नोव्हेंबर

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर आज नवी दिल्ली येथील म.प.च्या कन्व्हेंशन सेंटरमधल्या कॉन्फरन्समध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. हरविंदर सिंग असं या माथेफिरुचे नाव आहे. कॉन्फरन्समदधून बाहेर येताना पवार यांच्यावर या तरुणांचे हल्ला चढवला आणि पवाराच्या कानाशीलात लगावली. पवारांच्या सुरक्षा रक्षकांनी वेळीच झडप घालून तरुणांला चोप दिली आणि त्या पोलिसांच्या हवाली केले. या हल्ल्याचा सर्वच स्तरातून तीव्र निषेध व्यक्त होतं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बारामती बंदची हाक पुकारली आहे. मागील आठवड्या माजी दूरसंचार मंत्री सुखराम यांच्यावरही याच माथेफिरू तरुणांने हल्ला केला होता.

close