सर्वसामान्यांसाठी कर्ज झाली स्वस्त

December 15, 2008 6:42 AM0 commentsViews: 3

15 डिसेंबर, दिल्लीइंडियन बँक असोसिएशननं आज पाच लाखांपर्यंतच्या कर्जासाठी साडेआठ टक्केच एवढा व्याजदर राहील असं स्पष्ट केलंय. वीस लाखांपर्यंतच्या कर्जासाठी सव्वानऊ टक्के व्याजदर असणार आहे. पाच लाखांपर्यंतच्या कर्जासाठी कोणतीही प्रोसेसिंग फि आणि प्री-पेमेंट फि घेतली जाणार नाहीये. सरकारी बँकांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. मात्र बँकाना या कर्जावर दहा टक्के मार्जिन आकारण्याची मुभा देण्यात आली आहे. बँकांनी होमलोनसाठी व्याजदर कमी केले जातील असे संकेत गेल्याच आठवड्यात दिले आहेत आणि यासंदर्भातच आज घोषणा होऊ शकते. वीस लाख रुपयांपेक्षा कमी कर्जासाठी विशेष पॅकेजही यावेळी दिलं जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळे वीस लाखांपेक्षा कमी कर्जासाठी व्याजदर साडेआठ ते साडेनऊ टक्के ठेवला जाईल अशी शक्यता आहे. तसंच बँका प्रोसेसिंग फि देखील रद्द करण्याचा निर्णय घेतील असं सूत्रांकडून समजलं आहे.जागतिक मंदीचा सामना करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी पावलं उचलली आहेत. मंदीमुळे गेल्या काही दिवसात कर्ज घेण्याच्या प्रमाणात मोठी घट झाली होती. त्यामुळे ग्राहकांना बँकांकडे आकर्षित करण्यासाठी तसंच या मंदीतही सामान्य नागरिकाला दिलासा देण्यासाठी ही घोषणा केल्याचं मानलं जात आहे.

close