आर्मीची चित्तथरारक प्रात्यक्षिकं

November 25, 2011 3:11 PM0 commentsViews: 3

25 नोव्हेंबर

सैन्य दलाचा आर्मी एव्हीएशन कॉर्पस् सील्वर ज्युबिली कार्यक्रम नाशिकमध्ये सुरू झाला आहे. लष्कर प्रमुख जनरल विजयकुमार सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत याच्या उद्घाटनाचा शानदार सोहळा संपन्न झाला. 1 नोव्हेंबर 1986 मध्ये स्थापन झालेल्या या आर्मी एव्हीएशन कॉर्पमध्ये आतापर्यंत शेकडो सैनिकांनी एव्हीएशनचे ट्रेनिंग घेतलं आहे. गेल्या 25 वर्षात एव्हीएशनमध्ये झालेल्या प्रगतीचा यावेळी आढावा घेण्यात आला. प्रत्यक्ष युद्धभूमीवरच्या कसरतींची प्रात्यक्षिक सादर करण्यात आली.

close