गरिबीमुळे कसाब दहशतवादी बनला – पाकिस्तान पंतप्रधान

December 15, 2008 7:07 AM0 commentsViews: 6

15 डिसेंबर, पाकिस्तानअजमल कसाब हा केवळ गरिबीमुळेच दहशतवादी कृत्याकडं वळला, असं पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी म्हटलंय. गरिबी हीच पाकिस्तानसोमरची सर्वात मोठी समस्या असल्याचं त्यांनी सांगितलंय. असं म्हणून गिलानी यांनी अजमल हा पाकिस्तानचाच रहिवासी आहे, याला एकप्रकारे सहमतीच दाखवलीय. "अतिरेकी कारवायांसाठी आम्ही आमची जमीन वापरू देणार नाही. भारत काय म्हणतो याच्याशी आम्ही बांधील नाही तर संयुक्त राष्ट्राशी आम्ही बांधील आहोत. आम्हाला युद्ध नको शांती हवीय. पण आमच्यावर झाल्यास आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ. गरिबी हे दहशतवादाचं मूळ आहे. आम्हाला त्याचं निर्मूलन करायला हवं" असं ते म्हणाले.आत्तापर्यंत कसाब पाकिस्तानी असल्याचे पाकिस्तानने वारंवार नाकारले होते. मात्र भारतानं त्यासंदर्भातले भक्कम पुरावे सादर केले आहेत. रविवारी इंग्लंडचे पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांनीही पाकिस्तानला जबाबदारीने वागण्याचा सल्ला दिला होता. त्या पार्श्वभूमीवर गिलानी यांच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानने कसाबच्या पाकिस्तानी नागरिकत्वासंदर्भात आपली भूमिका बदल्ण्याचे संकेत दिले आहेत, असं मानलं जात आहे.

close