ऑन ड्युटी फूल ‘झोपा’ !

November 28, 2011 5:21 PM0 commentsViews: 2

28 नोव्हेंबर

डोंबिवलीत काल पहाटे दरोडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण नागरिकांच्या सतर्कतेमुळे तीन दरोडेखोरांना पकडण्यात आलं आहे. यावेळी दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत पाच जण जखमी झाले. प्रत्यक्षात दरोडा पडला त्यावेळी नागरिकांनी पोलिसांना फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण दोन महिने फोनचं बिल न भरल्यानं फोन कनेक्शन कापण्यात आले होते. परिणामी नागरिकांनी स्वत:चं दरोडेखोरांशी दोन हात केले. आणि त्यानंतर नागरिक पोलीस ठाण्यात गेले असता पोलीस चक्क टेबलवर झोपले होते.याशिवाय ज्याठिकाणी कैद्यांना ठेवण्यात आलं होतं त्या लॉकअपचा दरवाजाही उघडा होता. परिणामी दरोडा पडल्याच्या तीन तासानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

close