खासदार लाचप्रकरणी अमरसिंग आणि अहमद पटेल निर्दोष

December 15, 2008 7:12 AM0 commentsViews: 1

15 डिसेंबर, दिल्ली खासदार लाचप्रकरणाचा अहवाल सोमवारी संसदेत सादर करण्यात आला. या रिपोर्टमध्ये समाजवादी पक्षाचे अमरर सिंग आणि काँग्रेसचे अहमद पटेल यांना क्लीनचीट देण्यात आली आहे. मात्र भाजप खासदारांना पैसे देणार्‍या संजीव सक्सेनावर मात्र या अहवालात ठपका ठेवण्यात आला आहे. संजीव सक्सेनाचं वागणं संशयास्पद असल्याचं या अहवालात नमुद करण्यात आलं आहे.12 जुलै रोजी विश्वासदर्शक ठरावात सरकारच्या बाजूने मतदान करण्यासाठी आपल्याला पैसे दिले गेल्याचा आरोप भाजपच्या खासदारांनी केला होता. भर संसदेत नोटांच्या गड्ड्या दाखवत त्यांनी सरकार वाचवण्यासाठी अमर सिंग आणि अहमद पटेल यांच्या सांगण्यावरून आपल्याला लाच देऊ केल्याचा आरोप केला होता. या प्रकारानं देशभर खळबळ उडाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्याची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. मात्र या समितीनं सादर केलेल्या अहवालात अमर सिंग आणि अहमद पटेल यांना निर्दोष ठरवलं आहे.

close