हर्षवर्धन पाटलांनी आपलं घरं नीट सांभाळावे – अजितदादा

December 9, 2011 11:44 AM0 commentsViews: 10

09 डिसेंबर

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यातलं हाडवैर काही नवं नाही. गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये इंदापूरमध्ये शेवटच्या घडीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा घेऊन हर्षवर्धन पाटलांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर कुरघोडी केली. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला. त्याची सल अजूनही अजित पवारांच्या मनात कायम आहे. त्यामुळेच पुणे बारामती आणि सोलापूर पट्‌ट्यात अजित पवार विरूद्ध हर्षवर्धन पाटील असं शाब्दिक द्वंद्व प्रचारादरम्यान पाहायला मिळतंय. बार्शीत नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांवर इंदापूरचा दाखला देत हल्लाच चढवला. साध्या नगरपालिका ज्याना माहिती नाही, त्यांच्या ताब्यातच नगरपालिका नाही त्यामुळे त्यांची कीव येते असा टोला अजितदादांनी लगावला. जो ज्यांचे घर नीट सांभाळतो तो सर्वांना पुढे नेतो असंही अजितदादा म्हणाले. तसेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही अजित पवारांनी टीका केली.

close