अ‍ॅ.देशमुखांच्या घरावर शिवसेनेचा हल्ला

December 15, 2008 3:16 AM0 commentsViews: 4

15 डिसेंबर, अमरावतीअमरावतीमध्ये महेश देशमुख यांच्या घराची शिवसेनेनं तोडफोड केली. महेश देशमुख यांनी कसाबचं वकीलपत्र घेण्याची तयारी दाखवली होती. त्याचा निषेध करत शिवसैनिकांनी देशमुख यांच्या घरावर हल्लाबोल करत मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. देशमुख यांनी एटीएसच्या कमिशनरकडे कसाबला भेटण्याची परवानगीही मागितली असल्याचं समजतंय. त्यामुळे शिवसैनिक चिडले आणि त्यांनी देशमुखांच्या घरावर हल्ला केला. यावेळी शिवसेना कार्यकरत्यांनी दगडफेकही केली, तसच देशमुख यांच्या घरात घुसून कागदपत्रांचीही नासधूस केली. कसाबचं वकीलपत्र घेण्याची तयारी दाखवल्याबद्दल अ‍ॅ. अशोक सरोगी यांच्याविरुद्धही शिवसेनेनं रविवारी आंदोलन छेडलं होतं. मात्र अ‍ॅ. सरोगी यांनी माफी मागत आपण कसाबचं वकालपत्र घेणार नसल्याचं स्पष्ट केलं.

close