मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जुगलबंदी

December 10, 2011 1:31 PM0 commentsViews: 8

11 डिसेंबर

सातारा जिल्ह्यातल्या म्हसवडमध्ये नगरपालिका निवडणुक प्रचाराच्या प्रार्श्वभूमिवर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली. अजित पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना टोला मारला. आम्ही लोकांची कामं करतो म्हणून आम्ही कधी पराभूत झालो नाही असं पवार म्हणाले. तसेच माझ्या हाती 4200 कोटींचं बजेट असल्याचंही अजित पवार म्हणाले, त्यावर आता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिलंय.

close