अण्णा सोबती तपासून घ्या – नाना

December 10, 2011 1:15 PM0 commentsViews: 50

11 डिसेंबर

अण्णा हजारे यांनी आपल्या सोबत असलेली माणसं तपासून घ्यावी एवढ्या मोठ्या जनआंदोलनाचे नेतृत्व करत असतांना ती माणसं तपासून पाहणे गरजेचं आहे असा सल्ला नाना पाटेकर यांनी अण्णांना दिला. तसेच अण्णांना आपला पहिल्यापासून पाठिंबा आहे आणि आताही असणार आहे असंही नानांनी स्पष्ट केलं. नाना पाटेकरांना नुकतंच पुल स्मृती पुरस्काराची घोषणा झाली आहे. यानिमित्त आयबीएन लोकमतशी बोलतांना नानांनी ही प्रतिक्रिया दिली.

नाना पाटेकर यांना पु.ल.देशपांडे स्मृती पुरस्कार घोषित झाला. या पुरस्कारबद्दल नानांनी आपल्या शैलीत आपली प्रतिक्रिया दिली. नाना पाटेकर म्हणतात, आई वडील हे रक्ताचं नात पण ज्यानंतर तुमचा पिंड जोपसला जातो ती ही मंडळी आहे. यांच्यामुळेच आमचा सर्वांगिण विकास होऊ शकला आहे त्यामुळे त्यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार केव्हाही मोठा आहे असं मत नाना पाटेकर यांनी आयबीएन लोकमतकडे व्यक्त केलं.

त्याच बरोबर मध्यंतरी भारतरत्न पुरस्काराची चर्चा सुरु होती पण भारतरत्न हा पुरस्कार ज्यांनी देशासाठी आयुष्य वाहून दिले अशा व्यक्तींना तो देण्यात यावा खेळाडूंसाठी वेगळे पुरस्कार आहेच असं सांगत सचिनला भारतरत्न देण्यात यावा या मागणीला सचिनचे नाव घेतं नानांनी विरोध दर्शवला. अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकाच्या तिसर्‍या लढाईसाठी एैलान केले आहे यावर नानांना विचारले असता नाना म्हणतात, महात्मा गांधी यांच्या आंदोलनात सहभागी झालेली मंडळी आणि त्यावेळेसची परिस्थिती आणि आजची परिस्थिती ही कोणालाही भ्रष्टाचार नको आहे.

मुद्दा एवढाचं आहे अण्णा मी तुमच्या मागे राहुन फोटो काढेल पण तुम्हाला माहित आहे का मी कोण आहे ? त्यामुळे तुमच्या मागे व्यक्ती कोण आहे ही तपासून पाहावी. एवढ्या मोठ्या आंदोलनात नेतृत्व करणार्‍यांचा चेहरा समोर असतो त्यांना मागे पाहता येत नाही. त्यामुळे तुमच्या चळवळीत कोण माणसं आहे ती तपासून पाहण गरजेचं आहे त्यांच्यावर आंदोलनाचं यश अपयश अवलंबून असतं. तसेच अण्णा हे स्वच्छ चरित्र्याचे व्यक्ती आहे त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा आहे पण अण्णांनी एकट असं राहून फायदा नाही बाकीच्या सोबतींही असं राहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लोकपाल विधेयक आलंच पाहिजे त्यामुळे कुठे तरी यावर भ्रष्टाचारावर अंकुश बसेल पण त्यामुळे सर्व प्रश्न सुटतील हा मोठा प्रश्न आहे. त्यासाठी भ्रष्टाचार मिटवण्यासाठी मी माझ्यापासून सुरूवात करतो तरच हे सगळ आटोक्यात येऊ शकतं असा विश्वासही नानांनी व्यक्त केला.

close