अण्णांच्या लढ्याला जनतेचा सक्रीय पाठिंबा

December 11, 2011 9:38 AM0 commentsViews: 7

11 डिसेंबर

अण्णा हजारे यांच्या एक दिवशीय आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राळेगणमध्येही आज धरणं आंदोलन आणि उपोषण होतं आहे. आज राळेगण गावबंद ची हाक दिली आहे. अण्णांच्या आंदोलनाला घरचा पाठिंबा देणारे सर्व गावकरी आंदोलनात उतरले आहे. आज सकाळी शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून 'भ्रष्टाचार हटवा देश वाचवा' चा नारा दिला. अण्णांसोबत ग्रामसभा झाली होती तेव्हा ग्रामस्थांनी उपोषणात सहभागी होणाच्या आणि बंदचा निर्णय घेतला होता. अण्णांनी देशाच्या विकासासाठी लोकपालचा लढा उभारला आहे. सरकारने दखल घेऊन लोकपाल पास करावे अशी मागणी राळेगणवासी करत आहे. यासाठी यादवबाबा मंदिरात राळेगणवासी उपोषणाला बसला आहे.

तर अण्णा हजारेंच्या एक दिवसाच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईकरांनी शिवाजी पार्क ते आझाद मैदानापर्यंत रॅली काढली आहे. अण्णांच्या मागील आंदोलनाप्रमाणे यावेळीही मंुबईतल्या विविध भागातून आंदोलनं सुरु झाली आहेत. शिवाजी पार्कवर जमलेल्या अण्णा समर्थकांनी लोकपाल लेकर रहेंगेचा घोषणा दिल्या. महागाई,भ्रष्टाचारामुळे जनता वैतागली आहे सरकारने अण्णांचे लोकपाल पास करावे अशी मागणी यावेळी अण्णा समर्थकांनी केली.

अण्णांच्या या लाक्षणिक उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातही आज आंदोलन केलं जातं आहे. पुण्याच्या बालगंधर्व चौकात पुण्यातील नागरिक आंदोलन करत आहे.

close