मनसेचा विजय हा टीकाकारांना चपराक – राज ठाकरे

December 13, 2011 12:39 PM0 commentsViews: 7

13 डिसेंबर

मनसेला काही लोकांनी मुंबई,ठाणे पुरते जे मर्यादित समज होते त्यांनी आता नगरपालिका निवडणुकीत जनतेने जो कौल दिला आहे तो लक्षात घ्यावा मनसेचा हा विजय टीकाकारांना चपराक बसली आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज राज यांनी आपल्या निवासस्थानी कृष्णकुंजवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. तसेच हा विजय स्थानिक मनसे कार्यकर्त्यामुळेच मिळू शकला आणि हे त्यांचे यश आहे असंही राज यांनी सांगितले. तसेच राज यांनी पुन्हा एकदा उत्तरभारतीयांचा समाचार घेतला. परप्रांतीयांच्या लोढ्यांमुळे मुंबईच्या समस्या वाढल्या आहे असा आरोप राज यांनी केला.

close