चेन्नई टेस्टमध्ये भारत विजयाच्या उंबरठ्यावर

December 15, 2008 8:57 AM0 commentsViews: 6

15 डिसेंबर, चेन्नईचेन्नई टेस्ट सध्या रंगतदार अवस्थेत आहे. 387 रन्सचा पाठलाग करताना भारताला शंभर पेक्षा कमी रन्सची गरज आहे आणि सहा विकेट्स भारताच्या हातात आहेत. तेंडुलकर आणि युवराज यांनी पाचव्या विकेटसाठी हाफ सेंच्युरी पार्टनरशिप केली आहे. या जोडीवरच भारताची भिस्त आहे. सचिनने हाफ सेंच्युरी पूर्ण केली आहे. लक्ष्मण आणि गंभीर बरोबर त्याने दोन उपयुक्त पार्टनरशिप केल्या. लक्ष्मण चांगला जम बसलोला असताना आऊट झाला. त्याने 26 रन्स केले. युवराज सिंग सचिनला चांगली साथ देत असून तो हाफ सेंच्युरी पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. आज सकाळी गंभीरनेही सुरेख बॅटिंग करत आपली हाफ सेंच्युरी पूर्ण केली. पण मोठा स्कोअर करण्यात तो अयशस्वी टरला. तर द्रविडचा खराब फॉर्म आजही सुरु राहिला. तो चार रन्सवर आऊट झाला.

close