पुण्याजवळ सुखोई विमान कोसळले

December 13, 2011 7:46 AM0 commentsViews: 57

13 डिसेंबर

आज पुण्याजवळ सुखोई 30 MKI या लढाऊ विमानाला अपघात झाल्याने ते वाडेबोलाईजवळ कोसळले आहे. लोहगावहून या विमाने उडाण केले होते. कोसळलेलं हे विमान पूर्णपणे जळून खाक झालं आहे. प्रशिक्षणावेळी हा अपघात झाल्याचं समजतंय. विमानातील दोन्ही पायलटनी पॅराशूटच्या साह्याने उडी घेतली. त्यामुळे पायलट बचावले. अपघातग्रस्त विमान मोकळ्या जागेत कोसळल्याने कोणतीही जीवीत हानी झालेली नाही अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

close