निखिल वागळे यांना निर्भय पुरस्कार प्रदान

December 17, 2011 3:31 PM0 commentsViews: 7

17 डिसेंबर

आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांना निर्भय जन मंच पुरस्कार 2011 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वसईतल्या निर्भय जन मंच संस्थेच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो. वसई येथील काम करणार्‍या निर्भय जनमंच या संघटनेच्या 19 वर्धापन दिनानिमित्त निर्भय पुरस्कार सोहळा न्यु इंग्लिश स्कूल येथे पार पडला. समाजासाठी निर्भय,निर्भिर्डपणे विशेष उल्लेखनीय कार्य करण्यार्‍यांना दरवर्षी हा पुरस्कार देऊन गौरविले जाते. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी आजपर्यंत अनेक जनआंदोलनांना वेळोवेळी पाठिंबा दिला. त्यासाठी त्यांचा निर्भय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

close