‘पुल’कित नाना…

December 17, 2011 11:50 AM0 commentsViews: 19

17 डिसेंबर

नानाच्या नाटकातील प्रवेश, त्याची परखड मतं,कविता आणि त्याच्या पुलंबदलच्या आठवणी…यामुळे पुलोत्सवातलं सगळं वातावरण 'नाना'मय होऊन गेलं होतं. यंदाचा पु.ल.स्मृती पुरस्कार अभिनेते नाना पाटेकर यांना प्रदान करण्यात आला. पुण्यात पुलोत्सव 2011 चं उद्घाटन झालं. विजया मेहता यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार आर. के. लक्ष्मण आणि त्यांच्या पत्नी कमला लक्ष्मण यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.यावेळी आर के लक्ष्मण यांचा विजया मेहता यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

close