सर्वात वेगवान बाईक अवतरी नवी मुंबईत

December 17, 2011 3:33 PM0 commentsViews: 62

17 डिसेंबर

गल्फ ऑईलने जगातली सर्वात वेगवान बाईक नवी मुंबईत आणली आहे. वाशीतल्या इनऑर्बिट मॉलमध्ये ही गाडी ठेवण्यात आली आहे. 'ड्रँग बाईक' असं या बाईकचे नाव असून ती एका सेकंदात ताशी शंभर किमीचा वेग धरते. 1500 हॉर्स पॉवरची ताकद या बाईकमध्ये आहे. एफ 1 कारपेक्षाही ही हॉर्स पॉवर जास्त आहे. चौदा इंच रूंदीचे टायर आणि अल्युमिनियमची चेसी या बाईकला आहे. 1584 सीसीचे पॉवर इंजिन असलेल्या बाईकमध्ये चार सिलेंडर आणि 430 लिटरची इंधन टाकी आहे. इलेक्ट्रॉनिक आणि हायड्रॉलिक पद्धतीने क्लचचा वापर करण्यात आला असून या बाईकची किंमत सव्वा लाख डॉलर आहे.

close