यंदाचा ‘इंडियन ऑफ द इयर पुरस्कार’ अण्णांना प्रदान

December 17, 2011 12:30 PM0 commentsViews: 1

17 डिसेंबर

सीएनएन आयबीएनच्या इंडियन ऑफ द इयर पुरस्कारांचे काल एका दिमाखदार सोहळ्यात वितरण करण्यात आले. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाने जगभरात पोहोचलेल्या अण्णा हजारेंना यावेळी इंडियन ऑफ द इयर पुरस्काराने गौरवण्यात आलं. तर समाजसेवेसाठीचा पुरस्कार टीम अण्णांना प्रदान करण्यात आला आहे. यावेळी लोकपालच्या मुद्द्यावरून अण्णा आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यात जुगलबंदी झाली.

close