इराकी पत्रकाराचा बुश यांना जोड्याचा प्रसाद

December 15, 2008 11:01 AM0 commentsViews: 1

15 डिसेंबर, बगदादबगदाद मध्ये अमेरिकेचे प्रेसिडेंट जॉर्ज बुश यांची पत्रकार परिषद सुरु असताना एका पत्रकाराने त्याचे बूट बुश यांना फेकुन मारले. बगदाद मध्ये ते भेटीला आले असताना , भर पत्रकार परिषदेत हा प्रकार घडला. ह्या पत्रकाराची ओळख पटली असुन तो मुळचा इराकी आहे. पंतप्रधान नुरी अल मलिकी यांच्या सोबतच्या या पत्रकार परिषदेत या पत्रकाराने जोडे फेकले असता बुश खाली वाकले. यावेळी या पत्रकाराने शिवीगाळही केली. हा पत्रकार ईजिप्त मधल्या अल-बगदादीया या टेलिव्हीजन चॅनलचा पत्रकार असुन त्याचं नाव मुंताधर अल-झैदी आहे. या पत्रकाराला नंतर पकडण्यात आलं. बुश यांनी ही घटना फारशा गंभीरतेनं घेतली नाही. "या जोडयाचा नंबर 10 होता" अशी सहज प्रतिक्रिया बुश यांनी नोंदवली.

close