लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर पुरस्कारने दिग्गजांचा गौरव

December 21, 2011 5:50 PM0 commentsViews: 13

21 डिसेंबर

दैनिक लोकमततर्फे देण्यात येणारा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर हा पुरस्कार सोहळा मुंबईत मोठ्या थाटात पार पडला. यावेळी ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना जीवनगौरव पुरस्काराने तर अमिताभ बच्चन यांना महाराष्ट्राचा मानबिंदू या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनीही या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लावली होती. यावेळी डॉ. हिंमतराव बावस्कर यांना विज्ञान-तंत्रज्ञान विभागासाठी, बंडोपंत खेडकर यांना कला विभागासाठी, जलतरणपटू वीरधवल खाडे याला क्रीडा विभागासाठी, पारोमिता गोस्वामी यांना लोकसेवा आणि समाजसेवा या विभागासाठी, हणमंत गायकवाड यांना उद्योग विभागासाठी, किशोर कदम ऊर्फ सौमित्र यांना साहित्य विभागासाठी, शेख नसीर शेख नियाज यांना मनोरंजन विभागासाठी आणि राजू शेट्टी यांना राजकारण विभागासाठी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर या पुरस्काराने गौरवण्यात आलं.

close