मी महाकवी दु:खाचा…

March 26, 2012 11:48 AM0 commentsViews: 42

24 डिसेंबर

भय इथले संपत नाही… ती गेली तेव्हा..पाऊस कधीचा पडतो..अशा कवितांमध्ये आपल्याला गुंतवून ठेवणार्‍या कवी ग्रेस… ग्रेस यांना साहित्य अकादामीचा पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्या 'वार्‍यानं हलते रान' या लेखसंग्रहासाठी हा पुरस्कार आहे. त्याआधी त्यांना विदर्भभूषण पुरस्कारही मिळाला होता. या पुरस्कारांच्या निमित्तानं या मनस्वी कलावंताचे हे जग…

मी महाकवी दु:खाचा..प्राचीन नदीपरी खोल..दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल..

असं म्हणणारे माणिक गोडघाटे उर्फ ग्रेस. ग्रेस यांचं नाव घेतलं की आठवते…गूढरम्य संध्याकाळ आणि त्यांच्या संध्याकाळच्या कविता. त्यामागोमाग येतात… चंद्रमाधवीच्या प्रदेशातल्या आठवणी … आणि राजपुत्र आणि डालिर्ंग. ती गेली तेव्हा रिमझिम….अशा त्यांच्या अनेक कवितांनी आपल्या हृदयाचा ठाव घेतला.

कवितेतूनच बोलणार्‍या ग्रेस यांनी संध्यामग्न पुरुषाची लक्षणे या शीर्षकाने स्तंभलेखनही केलं. चर्चबेल, मितवा, मृगजळाचे बांधकाम, वार्‍याने हलते रान.. हे त्यांचे ललित लेखसंग्रहही गाजले.

दु:ख भराला आलं की चंद्र माथ्यावर येतो असं जेव्हा ते म्हणतात. तेव्हा आपणही तो अनुभव घेतो..जसा अनुभव दु:खाचा..तसाच…एकांताचा, सुखाचा आणि प्रेमाचाही… नाहीच कुणी रे अपुले प्राणांवर नभ धरणारे..असं जरी हा कवी म्हणत असला तरी ग्रेसच्या अनेक कवितांनी आपल्या प्राणांवर पाखर घातली आहे..

close