अण्णांनी उपोषण सोडलं

December 28, 2011 4:21 PM0 commentsViews: 2

28 डिसेंबर

लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी मुंबईत 3 दिवसांचे उपोषण करणार होते मात्र तब्येत खालवल्यामुळे अण्णांनी दुसर्‍या दिवशी आपलं उपोषण सोडलं आहे. राळेगण येथील लहान मुलीच्या हातून लिंबूपाणी घेऊन अण्णांनी उपोषण सोडलं. तसेच यावेळी दिल्ली आणि मुंबईत काही समर्थक उपोषणाला बसले होते त्यांनी उपोषण सोडावे असं आवाहनही अण्णांनी केलं. दरम्यान, या अगोदर अण्णांनी सरकारवर तोफ डागली. सरकारने लोकपाल विधेयक मंजूर करुन लोकांची फसवणूक केली आहे, या सरकारला धडा शिकवण्यासाठी येत्या 5 राज्यात निवडणुका होतं आहे तिथे जाऊन प्रचार करणार आहे आता यासाठी मतदार जागृती अभियान करणार आहोत त्याचबरोबर जेलभरो आंदोलन, धरणं आंदोलन आता मागे घेत आहोत असंही अण्णांनी जाहीर केलं.

close