अकोल्यातील शेततळी बांधकामात भ्रष्टाचार

December 15, 2008 2:38 PM0 commentsViews: 5

15 डिसेंबर अकोलाप्रवीण मनोहरअकोला जिल्ह्यात संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेतून बांधण्यात आलेले शेततळेच चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत वस्तुस्थिती अशी, पावसाचं पाणी शेतातील पिकांच्या कामी यावं यासाठी सरकारनं शेतक-यांच्या शेतावर छोटी शेततळी लघुसिंचन विभागाकडून बांधली. अकोट तालुक्यातील खेर्डा गावचे डिगांबर आवारे यांच्या ह्या अडीच एकर शेतावर सरकारच्या संपूर्ण ग्रामीण योजनेअंतर्गत शेततळे बांधण्यात आल्याची नोंद आहे. पण त्यांच्या शेतात तळं नसल्यानं त्यांना आता प्रश्न पडला आहे.सरकारी कागदोपत्री मात्र ह्याच शेतात शेततळं खोदल्याची नोंद आहे. याच शेतात संपूर्ण ग्रामीण योजनेअंतर्गत 323 मजूरांनी काम केलंअसल्याची नोंद आहे. याबाबत लघुसिंचन विभागाच्या शाखा अभियंत्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर साहेब दौ-यावर असल्याचं कळालं. अकोल्यातील जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी , नितीन खाडे यांना विचारलं असता हे जे काही प्रकरण आहे त्याची सविस्तर चौकशी होईल.त्यानंतर खरंच त्याजागेवर शेततळं झालं की नाही हे चौकशीतच बाहेर येईल असं त्यांनी सांगितलं. अकोल्यातील इतर तालुक्यातही अशाच प्रकारे कागदोपत्री शेततळी खोदल्याचं प्रकार उघडकीस आले आहेत. सरकारच्या शेतक-यांसाठीच्या योजनांचे सरकारी अधिकारीच कसे बारा वाजवतात हे अशा प्रकरणांमुळे उघड होतंआहे.

close