‘माझी काळजी करु नका, सर्वांना नवं वर्षाच्या शुभेच्छा’

January 1, 2012 3:16 PM0 commentsViews: 9

01 जानेवारी

माझी काळजी करु नका, माझी तब्येत आता बरी आहे असं सांगत अण्णा हजारे यांनी सर्व देशबांधवांना नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. अण्णा हजारे यांची तब्येत खालावल्याने त्यांना काल पुण्यातील संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. पण अण्णांच्या तब्येतीत आता झपाट्याने सुधारणा होत असून त्यांनी आज सकाळी नाश्ता केल्याची माहितीही डॉ. संचेती यांनी दिली. अण्णांच्या काही टेस्टही करण्यात आल्या आहेत. आता त्यांना विश्रांतीची गरज असून चिंतेची गरज नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केलं. मात्र त्यांनी कमीतकमी एक महिना उपोषण करु नये असा सल्ला डॉक्टरांनी केला. अण्णांची प्रकृती खालावल्यामुळे टीम अण्णांच्या कोअर कमिटीची बैठकही पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, अण्णांचे सहकारी अरविंद केजरीवाल उद्या पुण्यात येणार आहेत. अण्णांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ते उद्या पुण्यात येतील. अण्णांनी पाच ते सहा दिवस संपूर्ण विश्रांती घेतल्यानंतर कोअर कमिटीची बैठक होईल, असं अण्णांचे सहकारी सुरेश पठारे यांनी सांगितले.

close