नेटवर्क 18 बनली देशातील सर्वात मोठी मीडिया कंपनी

January 3, 2012 5:34 PM0 commentsViews: 65

03 जानेवारी

एक आनंदाची बातमी. नेटवर्क 18 नं ई टिव्ही या लोकप्रिय समुहातले 10 चॅनल्स खरेदी केले आहेत. त्यामुळे आता नेटवर्क 18 भारतातली सगळ्यात मोठी मीडिया कंपनी बनली आहेत. मराठी, कन्नड, बंगाली, गुजराती, हिंदी आणि उर्दू भाषेतले हे चॅनल्स एकूण 2100 कोटी रुपयांना विकत घेण्यात आले आहे. ही रक्कम उभी करण्यासाठी नेटवर्क-18 आता 2700 कोटी रुपयांचा राइट्स इशू आणणार आहे. या इशूमुळे कंपनीवर आधीपासून असलेल्या कर्जाचा ताणही कमी होणार आहे. ई-टिव्हीचे व्यवस्थापकीय आणि संपादकीय हक्क आता टीव्ही-18 कडे असतील. या कराराअंतर्गत आता रिलायन्सच्या इन्फोटेल ब्रॉडबँड सर्विसेसला टिव्ही 18 च्या कार्यक्रमांना ऍक्सेस मिळेल. आयबीएन लोकमत हे चॅनल नेटवर्क 18 ग्रूपचा भाग आहे.

close