अमरावतीमध्ये केलं गेलं शोले टाईप आंदोलन

December 15, 2008 10:54 AM0 commentsViews: 2

15 डिसेंबर अमरावतीअचलपूर दंगलीतील दोषींवर कारवाई करावी. तसंच अमरावती जिल्हा रुग्णालयात ब्लड बँकेची सुविधा उपलब्ध करून द्यावी. अशा विविध मागण्यांसाठी अमरावती इथल्या इन्कलाब संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शोले टाईप आंदोलन केलं. संघटनेचे कार्यकर्ते 25 मीटर उंचीच्या पाण्याच्या टाकीवर चढले. मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर टाकीवरून उडया मारण्याची धमकी त्यांनी दिल्याने पोलिसांनी परिसराला वेढलं. निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आंदोलकांशी चर्चा केली आणि त्यांच्या मागण्या तात्काळ पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. असं असलं तरीही इन्कलाब संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन सुरूच ठेवलं आहे.

close