इंदू मिलचा मुद्या फक्त राजकारणासाठी – राज ठाकरे

January 9, 2012 5:55 PM0 commentsViews: 13

09 जानेवारी

इंदू मिलची जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी मिळावी यासाठी सध्या जे आंदोलन सुरू आहे ते राजकीय स्वार्थासाठी असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. विलेपार्लेमध्ये झालेल्या मॅजेस्टिक गप्पांमध्ये राज ठाकरेंनी अनेक विषयांवर आपली मतं मांडली. मुंबईत शिवाजी महाराजांचे मोठं स्मारक बांधण्यापेक्षा तो पैसा राज्यातील गड-किल्लांच्या दुरूस्ती आणि पाहणीवर खर्च केला गेला पाहिजे असं मतही राज ठाकरेंनी व्यक्त केलं. मनसेचं इंजिन आत्मविश्वासावर धावतंय, एकदा हातात सत्ता देऊन बघा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. तर अमिताभ बच्चन यांच्यावर केलेली टीका आणि पेडररोड फ्लायओव्हरचा मुद्दा यावरही राज ठाकरेंनी आपली भूमिका यावेळी स्पष्ट केली.

close