राणीचं अय्या..इश्श..गं..बाई !

January 12, 2012 3:46 PM0 commentsViews: 110

12 जानेवारी

अबोली रंगाची पैठणी, हिरव्या बांगड्या, नथ अशा अस्सल मराठमोळ्या रुपात आपल्या दिलखेच अदानी राणीने पुणेकरांनी जिंकले..निमित्त होते पुणे फेस्टिवलचं..आज पुणे फेस्टिव्हलचा उद्घाटन सोहळा थाटात पार पडला. यावेळी राणीने नमस्कार मंडळी अशी साद देत पुणेकरांना चकीत केलं. माझा जन्म मुंबईत झाला , मी मनापासून महाराष्ट्रीयनच आहे असं राणीने ठासून सांगितले. तसेच पुण्यात शुटिंग करायला आवडलं आणि पुणेही आवडलंय. भाषणाच्या शेवटला अय्या…अय्या..इश्श..गं..बाई…असं म्हणून पुणेकरांना घायाल केलं. राणीची ही नजाकत पाहून पुणेकरच नाही तर टिव्हीवरुन हा सोहळा पहाणारे तिचे चाहतेही नक्कीच खुष झालेत. पण राणीनं तिच्या बोलण्याच्या शेवटी उच्चारलेले शब्द हे तिच्या नव्या हिंदी सिनेमाशी संबंधितही आहे, अय्या या आगामी हिंदी सिनेमात राणी काम करतेय. मराठमोळा दिग्दर्शक सचिन कुंडलकर हा सिनेमा दिग्दर्शित करतोय, राणीबरोबर यात सुबोध भावेही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे या सिनेमाचं शूट सध्या पुण्यात सुरुही आहे.

close