नॅशनल पार्कमध्ये नवीन पाहुण्यांचे आगमन

January 12, 2012 5:24 PM0 commentsViews: 36

12 जानेवारी – उदय जाधव, मुंबई

मुंबईतल्या नॅशनल पार्कमध्ये तीन नवीन पाहुण्यांचं आगमन झालं आहे. हे पाहुणे दुसरे तिसरे कोणी नसून सिंहाचे छावे आहेत. नॅशनल पार्कमधील शोभा सिंहीणीने तीन छाव्यांना जन्मं दिला आहे. एकमेकांशी मस्ती करत बागडणारे हे तीन सिंहाचे छावे आहेत नॅशनल पार्कमधल्या शोभा सिंहिणीचे… जगभरात सिंहांची संख्या कमी होत चालली आहे. या छाव्यांच्या जन्मामुळे सर्वांना आनंद झाला. या रुबाबदार मुंबईकरांच्या जन्मामुळे.. नॅशनल पार्कातल्या सिंहांची संख्या 6 झाली आहेत. शोभा सिंहीणीचं बाळंतपण सुरक्षित आणि नैसगिर्क पद्धतीने.. पण तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करण्यात आलं.

नॅशनल पार्कमधल्या शोभा सिंहिणीचे हे तीन छावे आता साडेतीन महिन्यांचे आहेत. आणि पुढच्या अडीच वर्षात त्यांची पूर्ण वाढ होईल… त्यानंतर शोभा सिंहीण आणि तिच्या छाव्याचं नातं हे बदलेलं असेल. जगात आफ्रिका आणि भारत याच देशात सिंहांचा आढळ आहे. त्यामुळे ही प्रजाती नष्ट होऊ नये यासाठी केल्या जाणार्‍या सगळ्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळणं आवश्यक आहे.

close