कोरियाच्या कैदेतील दोन भारतीयांना सोडण्याची मागणी

December 15, 2008 6:14 PM0 commentsViews: 2

15 डिसेंबर मुंबईअलका धुपकर गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात कोरियामध्ये समुद्रात झालेल्या एका अपघात प्रकरणी बोटीचा कॅप्टन आणि मुख्य अधिकारी यांना कोरियन हाय कोर्टाने दोषी ठरवलं आहे. दक्षिण कोरियामध्ये कैद असलेल्या दोन भारतीय अधिका-यांना तातडीने जामिनावर सोडण्याची मागणी गोदी कामगार संघटना आणि सी फेअरस असोसिएशनने केली आहे. या दोन्ही संघटनांसोबत मुंबईतल्या कामगार संघटनांची मुंबईत महत्त्वाची बैठक झाली. भारतीय अधिका-यांना कोरियामध्ये देण्यात आलेल्या या एकतर्फी शिक्षेचा आंतरराष्ट्रीय पातळीवरही निषेध करण्यात येत आहे. कॅप्टन जसप्रीत चावला डेहराडूनचे आणि मुख्य अधिकारी श्याम चेतन गोव्याचे. दोघेही सध्या दक्षिण कोरियाच्या तुरुंगात आठ महिन्यांसाठी शिक्षा भोगत आहेत.हेबी स्पिरीट या जहाजावर हे दोघही नोकरी करायचे. जहाजाला झालेल्या अपघातामध्ये 65000 टन इतकं क्रूड तेल समुद्रात मिसळलं गेलं होतं. यामुळे झालेल्या नुकसान आणि प्रदूषणाची शिक्षा म्हणून इतकी भयानक वागणूक या अधिका-यांना दिली जात आहे. पण अपघातात खरा दोष सॅमसंग कंपनीचा असल्याचा दावा भारतीय सी फेअर्स असोसिएशनने केला आहे.या दोन्ही अधिका-यांना कोर्टाने दिलेल्या शिक्षेचा निषेध म्हणून भारतातल्या सॅमसंग कंपनीच्या प्रॉडक्टवर बहिष्कार घालण्याची मागणी भारतातल्या दोन प्रमुख सी फेअरस् असोसिएशनने केली आहे.

close