बाबा रामदेव यांच्यावर काळं फेकलं

January 14, 2012 10:34 AM0 commentsViews: 2

14 जानेवारी

दिल्लीमध्ये आज बाब रामदेव यांच्या तोंडावर काळंी शाई फेकण्यात आली. काळ्या पैशांचा मुद्दा आणि त्यासाठी पाच राज्यात स्वाभिमान यात्रा काढण्याची घोषणा करण्यासाठी बाबा रामदेवांनी पत्रकार परिषद घेतली. प्रेस संपवत असतानाचा एका हल्लखोराने अचानक येऊन त्यांच्यावर काळी शाई फेकली. त्यावेळी तिथं चांगलाच गोंधळ झाला. शाई फेकणारा बाबांच्या विरोधात जोरजोराने घोषणा देत होता. त्याला बाबांच्या समर्थकांनी पकडून चोप दिला. बाब रामदेवांनी पत्रकार परिषदेत सरकारवर कडक टीका केली होती, तसेच काळ्या पैशाचा मुद्दा उचलून धरत पाच राज्यात स्वाभिमान यात्रेचीही घोषणा केली .

close