औरंगाबादमधील गृहनिर्माण योजनेचा उडाला बोजवारा

December 15, 2008 10:33 AM0 commentsViews: 6

15 डिसेंबर औरंगाबादशेखलाल शेख औरंगाबाद शहरातील एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी सुधार योजनेचा बोजवारा उडालाय. महानगरपालिका झोपडपट्टीमध्ये 617 घरं बांधून देणार होती. मात्र प्रत्यक्षात 26 घरंच बांधण्यात आली आहेत. घर मिळेलं या आशेनं ज्यांनी आपली राहती घरं पाडली. त्यांचा संसार मात्र मागील एका वर्षापासून उघड्यावरच आहे.आंबेडकरनगरच्या झोपडपट्टीत राहणारे अनेकजण गेल्या दोन वर्षांपासून घर मिळण्याची वाट पाहत आहेत. एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत त्यांना घर मिळणारं होतं. प्रत्यक्षात त्यांना काहीच मिळालं नाही. आपल्या कुंटुंबासह सद्या ते पडक्या घरात राहत आहेत. महापालिकेनं त्यांना घरं बांधून दिलीच नाही. आता मात्र इथल्या नागरिकांनी घर पाडतांना महापालिकेशी करार केला नसल्याचं प्रशासनं सांगतं आहे. करार केलेला नसतांना मग इतक्या लोकांनी राहती घरं का पाडली याचं उत्तर मात्र महापालिकेकडे नाही.वर्षभरापूर्वी या योजनेचं उदघाटन करण्यात आलं. त्यासाठी शासनानं एक कोटी रुपयांच्या निधी महापालिकेला दिला. मात्र महापालिकेनं लोकांना घरच्या ऐवजी बेघर करून टाकलं आहे.

close