तिकिटासाठी दोन्ही बायकांना मैदानात उतरवलं !

January 19, 2012 11:32 AM0 commentsViews: 49

19 जानेवारीमहापालिका निवडणुकीत सहभागी होणार्‍या प्रत्येक उमेदवारांची आपल्याल्याच तिकीटं मिळावी अशी इच्छा असते. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून वेग-वेगळी शक्कल लढवली जाते. आणि त्यातचं आता पिंपरी-चिंचवडमध्ये एका इच्छुक उमेदवारानेे त्याच्या दोन पत्नींना निवडणुकीच्या रिंगणात उभं केलं आहे.

'दोन बायका आणि फजीती एैका' असं म्हणतात… पण पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे नेते दिलीप जगताप यांच्यासाठी मात्र असं नाही. महिलांसाठी आरक्षित झालेल्या वॉर्डात तिकीट घरातच रहावं.. म्हणून जगताप यांनी आपल्या दोन्ही बायकांना मैदानात उतरवलं आहे. लक्ष्मी आणि सरस्वती या सवती असल्या तरी त्यांच्यात कमालीचं सख्य आहे. त्यांच्यापैकी कुणालाही तिकीट मिळाल तर दुसरीला हरकत नाही. आता या दोघींपैकी तिकीट कोणाला द्यायचं याचा निर्णय पक्ष घेईल. पण तिकीट कुणालाही मिळालं तर ते आपल्याच घरात यावं यासाठी दिलीपराव्ंाानी लढवलेली शक्कल अफलातून आहे, यात शंका नाही !

close