मतदार राजाला आकर्षित करण्यासाठी आला वासुदेव !

January 22, 2012 3:34 PM0 commentsViews: 55

गोविंद वाकडे , पिंपरी – चिंचवड

22 जानेवारी

महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदार राजाला आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून निरनिराळ्या युक्त्या लढवल्या जात आहे. अशीच एक युक्ती लढवलीये पिंपरी चिंचवडचे काँग्रेसचे उमेदवार बाळा शिंदे यांनी. त्यांच्या प्रचारासाठी पंढरपूरहून तब्बल 25 वासुदेव पिंपरी – चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात दाखल झाले आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये आता पहाटे पहाटे वासुदेवाची प्रचाराची गीतं ऐकायला मिळत आहे. पायात चाळ, हातात चिपळ्या, टाळ आणि डोक्यावर मोरपंख या वेषातला वासुदेव यावेळी मात्र दानात 'मतं' मागतोय.

प्रचाराच्या या आगळ्यावेगळ्या फंड्यामुळे का होईना पण, शहरी भागात हरवत चाललेली ही वासुदेव संस्कृती पुन्हा एकदा जोपासली जात आहे. निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने तरी उमेदवारंाना वासुदेवाची गरज भासू लागली. पण यामुळे वासुदेवांनाही रोजगाराची संधी प्राप्ता झाल्याचा आनंद आहे.

वासुदेवाचा प्रचाराचा हा वेगळा फंडा मतदारांच्या लक्षात राहतोय हे खरं,पण याचा त्यांच्या मतावर किती परिणाम होईल हे मात्र निवडणुकीच्या निकालानतंरच स्पष्ट होईल.

close