शरद पवारांसोबतची मैत्री आजही कायम – बाळासाहेब

January 23, 2012 3:20 PM0 commentsViews: 8

23 जानेवारी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. आणि बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर खास महामृत्यूंजय यज्ञाचे आयोजन करण्यात आलं होतं. या यज्ञात बाळासाहेब स्वत: सहभागी झाले होते. तसेच मुंबईतल्या नेपाळ महासंघाकडून बाळासाहेबांची खास रुद्राक्षतुला करण्यात आली. या यज्ञानंतर बाळासाहेबांनी पत्रकारांशी बातचीत केली. यावेळी शरद पवारांसोबतची आपली मैत्री आजही कायम आहे, असं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर पवारांना मी माझ्या घरी बोलावीन तेव्हा तुम्हीही या असंही त्यांनी पत्रकारांना सांगितलं. कोणी गेलं म्हणून शिवसेना कमजोर होत नाही. मीसुद्धा काहीजणांना शिवसेनेतून काढलं आहे. हे असं चालूच राहतं अशी प्रतिक्रिया बाळासाहेबांनी आनंद परांजपे प्रकरणावर दिली.

close