फुटपाथवरील साईनबोर्डमुळे पुणेकर त्रस्त

December 15, 2008 12:20 PM0 commentsViews: 1

15 डिसेंबर पुणेजुगल राठीगेल्या महिन्यात पुण्यात झालेल्या कॉमनवेल्थ युथ गेम्सच्या निमित्तानं शहरात विकास कामं करण्यात आली. त्यासाठी शहरात विविध ठिकाणी साईनबोर्ड लावण्यात आले. पण हे बोर्ड फुटपाथवरच लावण्यात आल्यानं नागरिकांना त्रास होत आहे. शहरातल्या जवळपास सर्वच फुटपाथांची हीच परिस्थिती आहे. आयबीएन-लोकमतचे सिटीझन जर्नलिस्ट जुगल राठी यांचा हा रिपोर्ट.कॉमनवेल्थ युथ गेम्सच्या निमित्तानं शहरात विविध ठिकाणी साईनबोर्ड लावण्यात आले. पण हे साईन बोर्ड चुकीच्या जागी लावल्यामुळे अनेकांना त्रास होतो. पुण्यातील लॉ कॉलेजच्या समोरचा प्रभात रोड नेहमी गजबजलेला असतो. पण इथल्या फुटपाथवर अनेक ठिकाणी साईन बोर्ड लावण्यात आले आहेत. साईन बोर्ड फुटपाथवर असे लावण्यात आलेत ज्यामुळे त्यावरून चालताही येत नाही. त्यामुळे लोक स्वत:चा जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालत जातात. 2 मीटरच्या फुटपाथवर लाइटपोल, कचराकुंडी, तसंच निरनिराळया साईन बोर्डमुळे चालणं अशक्य झालं आहे. संबंधित खात्याने याची नोंद घेऊन चुकीच्या जागेवर लावण्यात आलेले साईन बोर्ड काढून टाकावेत जेणेकरून सामान्य नागरिकांचा त्रास वाचेल.

close