‘ही दोस्ती तुटायची नाय..’

January 23, 2012 6:20 PM0 commentsViews: 291

23 जानेवारी

'शरद पवारांसोबतची आपली मैत्री आजही कायम आहे, यासाठी तर पवारांना मी माझ्या घरी बोलावीन' आज आपल्या वाढदिवसाच्या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या मैत्रीला राजकारणाचा टच नसल्याचा पुन्हा एकदा आपल्या ठाकरी शैलीत स्पष्ट केलं. तर आपल्या मित्राला शुभेच्छा देत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बाळासाहेबांनी दिर्घआयुष्य लाभो त्यांची राजकीय कारकीर्द खूप मोठी आहे आम्ही राजकारणात एकमेकांसमोर आमनेसामने कित्येक वेळा आलो पण आम्ही त्यापलीकडे चांगले मित्र आहोत असं स्पष्ट केलं. शरद पवार यांनी खास आयबीएन लोकमतशी बातचीत केली.

यावेळी पवार यांनी आठवणींना उजाळा देत अनेक किस्से शेअर केले. बाळासाहेब एक उत्तम व्यंगचित्रकार आहेत. त्यांचं स्थान खूप मोठ आहे. यामुळे मी काँग्रेसमध्ये असताना सुध्दा त्यांच्या पहिल्या प्रचारसभेला आवर्जून हजर होतो ते काय बोलत आहे हे मी एकत होते त्याचे ही एक कारण होते, त्यावेळी मुंबईतील मराठी माणसासाठी महत्वाची भूमिका घेतली जात होती आणि बाळासाहेब मार्मिकमधून ते याची जागृती करत होते. त्यासाठी मी तिथे हजर होते. यानंतर काही दिवसांनी मी आणि बाळासाहेब यांनी 'राजनीती' नावाचे मासिक सुरु करण्याचे ठरवले होते. त्याकाळी टाईम्सचा एक अंक होता. तसा एक अंक काढवा मराठीत अशी आमची कल्पना होती. यामध्ये देशांची राज्यांची ,आणि खास करुन महाराष्ट्राची माहिती द्यावी असं आम्हाला वाटतं होतं. आणि आम्ही तो अंक काढलाही पहिला अंक सिध्दीविनायकाच्या चरणी अर्पण केला. त्याला खूप मोठा प्रतिसाद मिळाला होता पण पुढे काही तो सरक ला नाही ही गोष्ट वेगळी असो असंही पवार यांनी सांगितले.

तसेच बाळासाहेबांमध्ये असलेल्या नेतृत्व गुणामुळे तरुणांना आणि लोकांना त्यांनी एकत्र केलं. त्यांच्या या नेतृत्वामुळे खूप मोठी भींत उभी राहिली हे 100 टक्के समस्त महाराष्ट्राला मान्य आहे. पण नेतृत्वाची दिशा, विचारधारा ही कोणत्या वाटेनं जाते हे महत्वाचे आहे असंही पवार म्हणाले. पण बाळासाहेबांनी खूप माणसं उभी केली आणि कोणत्याही पक्षात माणसं घडवणं हे अवघड काम असतं पण बाळासाहेबांनी माणसं घडवली आणि त्याची मालिका तयार केली याची नोंद महाराष्ट्रात घेतली जाईल असं मत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केलं.

close