भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी खबरदारी घेऊ – अजितदादा

January 25, 2012 1:12 PM0 commentsViews: 4

25 जानेवारी

पुण्यात संतोष माने या माथेफिरु एसटी बस ड्रायव्हरने बस पळवून धुमाकूळ घातला. या घटनेत 8 निष्पाप लोकांचा बळी गेला. या घटनेची चौकशी करू व भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रयत्न करु असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजितदादांनी तातडीने ससुन हॉस्पिटलमध्ये जखमींची भेट घेतली यानंतर पत्रकारांशी बातचीत केली. यावेळी ते बोलत होते.

close