बस अपघातावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

January 25, 2012 2:22 PM0 commentsViews: 8

25 जानेवारी

पुण्यातील बस अपघातानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तातडीने ससून हॉस्पिटलमध्ये जाऊन पीडितांच्या नातेवाईकांची भेट घेतली. आचारसंहिता असल्याने या अपघातातल्या जखमींना मदत जाहीर करायची का हे निवडणूक आयोगाला विचारून ठरवण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या मदतीबद्दल राज्याच्या निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी अपघातात जखमी किंवा मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना दिली जाणारी आर्थिक मदत ही जिल्हाधिकार्‍यांमार्फतच दिली जाईल. राजकीय नेत्यांना आर्थिक मदत जाहीर करता येणार नाही असं मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी सांगितले.

close